शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या उपजिल्हा रूग्णालयास महिलांचे प्रसूतीसाठी प्राधान्य, दोन महिन्यात 324 महिलांची झाली नॉर्मल प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 16:15 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती  झाली आहे. यातील 324 महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर ५ सिजेरीअन आहेत. नॉर्मल प्रसूतीची वाढती संख्या व येथील विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात उपचारासाठी येण्यास महिला प्राधान्य देत आहेत. 

ठळक मुद्दे दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती  झाली आहे.दर शनिवारी जिल्हा शल्य चिकित्सक स्वत: शस्त्रक्रियासाठी रुग्णालयात येणार

परळी (बीड), दि.12 : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती  झाली आहे. यातील 324 महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर 5 सिजेरीअन आहेत. नॉर्मल प्रसूतीची वाढती संख्या व येथील विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात उपचारासाठी येण्यास महिला प्राधान्य देत आहेत. 

शहरातील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे महिलांना व्यवस्थित व योग्य उपचार होत आहेत. यामुळे प्रसूतीसाठी खाजगी रूग्णालयात होणारा भरमसाठ खर्च टळल्या जात आहे. याशिवाय ऍपेंडीक्स, हारणिया, गर्भाशयाची पिशवी काढणे व इतर शस्त्रक्रियाही करण्याची सुविधा असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनिल जाधव, डॉ. रामेश्वर लटपटे, डॉ. संजय गित्ते, डॉ. विजय गोरे, निता मगरे, एन.पी. चिखले, एस.एल. कावळे, शेप यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे महिलांच्या प्रसूती काळजीपूर्वक होत आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम येथे सदैव तयार असल्याने गरोदर मातांनी शासकिय उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत व खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च टाळावा असे आवाहनही डॉ.मंडलेचा यांनी केले.

रुग्णांचा वाढता ओघ ऑगस्ट 2017 मध्ये 168 गरोदर महिलांची नॉर्मल प्रसूती डिलेव्हरी झाली आहे. तर 3 महिलांची सिजेरीअन प्रसूती झाली.  तसेच अपेंडीक्सच्या ३ शस्त्रक्रिया झाल्या. सप्टेंबर 2017 मध्ये 156 महिलांच्या नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत व 12 महिलांच्या सिजेरीअन प्रसूती झाल्या. यासोबतच दोन रूग्णांचे अपॅंडीक्सचे ऑपरेशन करण्यात आले. 

मातांसाठी विशेष सुविधारूग्णालयात येणाऱ्या महिलांना दोन वेळचे जेवण, नाष्टा व चहाची सोय असते. तसेच, दारिद्रय रेषेखालील व अनुसूचित जाती-जमितीच्या महिलांना प्रसूतीनंतर 600 रुपयाचा धनादेश सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात येतो. 

दर शनिवारी येणार जिल्हा शल्य चिकित्सक काही दिवसांपूर्वी गर्भाशयाची पिशवी काढणे व अपेंडिक्स अशा दोन शस्त्रक्रियासाठी बीड येथून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आले होते. यापुढे दर शनिवारी सीजर, अपेंडिक्स, हर्निया, गर्भाशयाची पिशवी काढणे, दुर्बीणीद्वारे कुटूंब कल्याण शस्त्रक्रियासुद्धा स्वत: डॉ. थोरात करणार आहेत.याचा रूग्णांनी लाभ घ्यावा असेही उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.