शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

देयके न मिळाल्यामुळे छावणी बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:03 IST

मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देछावणी चालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चालकांची आर्थिक कोंडी

बीड : मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बुधवारपासून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेच्या वतीने घेतला आहे. याचे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.जिल्ह्यात चारा उपलब्ध नसल्यामुळे चारा छावणी चालकांना जिल्हा तसेच परराज्यातुन चारा चढ्या दराने विकत आणावा लागत आहे. यामुळे मागील वर्षापेक्षा खर्च दुप्पट वाढला आहे. परंतु शासनाचा निर्णय प्रति जनावरं ९० रुपये व लहान जनावरांसाठी ४५ रुपये देण्याचे ठरलेले असताना देखील, प्रत्येकी ७० व ३५ रुपया प्रमाणे देयके दिली जणार आहेत. त्यामध्ये देखील मुळ देयकाच्या रक्कमेत २५ टक्के कपात करुन देयके अदा केली जाणार आहेत. त्यामुळे छावणी चालकांवर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. ८ मे रोजी चारा छावणी चालक संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन दिले होते. त्यावेळी देयके १३ मे पर्यंत मिळाली नाहीत तर १४ मे रोजी छावणी बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, देयके अदा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. म्हणून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे घेतला होता. परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. व ९ ते ११ मे या दरम्यान केलेल्या तपासणीत जनावरांची संख्या ५० पेक्षा कमी आढळून आलेल्यांना देखील भरमसाठ दंड अकारण्यात आला आहे. वास्तविक पाहता २० ते २५ बैल जोड्या कामासाठी शेतकरी आपल्या शेतात घेऊन जातात, त्यामुळे ही तफावत होती तरी देखील तपासणी अधिकाºयांनी हालचाल नोंदवहीची दखल न घेता कारवाई केल्यामुळे छावणी चालकांची पिळवणूक होत आहे. या सर्व कारणांचा विचार केला तर छावणी चालकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते त्यामुळे बुधवारपासून चारा छावणी बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेने घेतला आहे. यावेळी छावणी चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक हिंगे, बबनराव गवते, प्रकाश कवटेकर, बळीराम गवते, अशोक सुखावसे, राजेंद्र मस्के, कलंदर पठाण, वैजीनाथ तांदळे, रमेश पोकळे, गणेश उगले आदींसह मोठ्या संख्येने छावणी चालक उपस्थित होते.संघटनेसोबत जिल्हाधिकाºयांची बैठकछावणी चालकांनी चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करीत देयके अदा केले जातील, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.बैठकीनंतर चारा छावण्या बंद न करण्याच्या निर्णयावर तोडगा निघाला असल्याचेही जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र