शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चमकोगिरी करायची न्हाय; बीडमध्ये आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, आकडा १६० वर पोहचला

By सोमनाथ खताळ | Updated: January 17, 2025 12:56 IST

जिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना आहेत. त्यातील २३२ जणांवर गुन्हे दाखल होते.

बीड : गुन्हे दाखल असतानाही नेत्यांसह अनेकांच्या कंबरेला बंदूक होत्या. हाच मुद्दा 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आगोदर १०० आणि आता गुरुवारी आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. आता हा आकडा १६० वर पोहोचला आहे. पोलिसांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चमकोगिरी करणाऱ्यांना कारवाई करून दणका दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवान्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधी व सत्ताधाऱ्यांनी यावर आवाज उठवला. परंतु त्याआधीच तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या लोकांकडे शस्त्र परवाना असलेल्यांची यादी जिल्हाधिकारी यांना पाठवली होती. परंतु निवडणूक व प्रशिक्षण यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु अधिवेशनात मुद्दा गाजताच त्यांनी संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेतली. त्यानंतर आठवड्यापूर्वी १०० आणि आता गुरुवारी आणखी ६० शस्त्र परवाना रद्द, निलंबित केले अहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

आणखी ७२ रडारवरजिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना आहेत. त्यातील २३२ जणांवर गुन्हे दाखल होते. त्यांची यादी गेल्यावर १०० परवाना अगोदर रद्द केले. त्यानंतर गुरुवारी ६० झाले. आणखी ७२ लोक रडारवर आहेत.

'लोकमत'च्या पाठपुराव्याला यश८ डिसेंबर २०२३ रोजी 'लोकमत'ने कोणावर किती गुन्हे याचे आकडेवारीसह वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी याचा पाठपुरावा केला. अधिवेशनात हा मुद्दा गाजला. नूतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनीही आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आतापर्यंत १६० शस्त्र परवाना रद्द केले आहेत.

नेत्यांचाही समावेशगुन्हे दाखल असलेल्या २३२ जणांच्या यादीत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदींचा समावेश होता. आता १६० रद्द झालेल्या परवान्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. इतर काही लोकांनी स्वसंरक्षणाऐवजी हवेत फायर करून चमकोगिरी केली होती. यामुळेही हा शस्त्र परवान्यांचा मुद्दा चव्हाट्यावर आला होता.

शस्त्र जमा करण्याची नोटीसआगोदर १०० परवाने रद्द केले होते. त्यांना आता जवळ असलेले शस्त्र जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत नोटीस बजावली आहे. जर शस्त्र आढळले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखलचा इशाराही दिला आहे. गुन्ह्यांचा निकाल लागल्यानंतर सहा महिने हा परवाना रद्द राहणार आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी