शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 17:07 IST

NEET EXAM Result : वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांची धुनी-भांडी करून दिला शिक्षणास आधार

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (बीड) : आई लोकांची धुणीभांडी करते, कसल्याही भौतिक सुविधा नाहीत, ना शिकवणी, ना कसला आधार तरीही मुलाने हार मानली नाही. यूट्यूबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून सेल्फस्टडी करत विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत (NEET EXAM Result 2022 ) . अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे. 

विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-२०१४ मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.

विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशी चा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. विनायक ची आई सुनीताबाई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  आजही लोकांची भांडी घासतात.आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली.नीट च्या शिकवणीची फिस भरू शकत नसल्याने त्याने यूट्यूब वर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाहून मेहनतीने अभ्यास केला.व नीट च्या परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले.

शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकारअत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी आधार माणुसकीचाचे अध्यक्ष अँड.संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रविंद लोमटे यांनी धुरा हाती घेतली आहे.

टॅग्स :BeedबीडNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र