रात्रीची गस्त सुरू करा अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे नागरिकांकडून खरेदी केली जात आहे. यामुळे यालोकांच्या नागरिकांच्या सुरक्षितेची गरज आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
ग्राहकांना अवाजवी वीज बिले
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात महावितरणकडून अनेक ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. या वाढीव आलेल्या बिलांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. महावितरणने मीटर रीडिंगप्रमाणे बिले द्यावीत, अशी मागणी होतआहे.
लाभार्थी वंचित
अंबाजोगाई : तालुक्यात अजूनही राजीव गांधी घरकुल योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित आहेत. शासनाने गरजू लोकांचा सर्व्हे करून अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आहे