शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता, आरोग्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:06 IST

वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्यापूर्वी व काहीही खाण्यापूर्वी नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या माणसापर्यंत ही सवय कायमस्वरूपी अंगीकारल्यास सर्वांचे आरोग्य अबाधित राहील मात्र त्यासाठी सर्वांनी मिळून एकित्रत प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.

ठळक मुद्देअमोल येडगे : जिल्हा परिषद शाळा, कार्यालयात हात धुवा दिन, प्रात्यक्षिकांतून वैयक्तिक स्वच्छतेची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्यापूर्वी व काहीही खाण्यापूर्वी नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या माणसापर्यंत ही सवय कायमस्वरूपी अंगीकारल्यास सर्वांचे आरोग्य अबाधित राहील मात्र त्यासाठी सर्वांनी मिळून एकित्रत प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.जिल्ह्यात स्वच्छ कार्यालय पंधरवडा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. सर्व कार्यालये, शाळा, अंगणवाडीत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून नियमित रोज हात धुण्याची सवय लागावी या उद्देशाने हा उपक्र म घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता खंडारे ,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बांगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महिलांच्या स्वच्छ हातांमध्ये कुटुंबाचे आरोग्य आहे. शाळा व अंगणवाडीमधील लहान मुलांच्या हातामध्ये भविष्यातील आरोग्य आहे. हे आरोग्य कायम स्वरूपी टिकण्यासाठी घरातील कर्त्या मंडळींनी मात्र पुढाकार घ्यावा व कायम मार्गदर्शन करावे असेही मत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. उपस्थित विभागाचे प्रमुख, कार्यालय प्रमुख व जिल्हा परिषद कर्मचारी यांना हात धुण्याच्या पद्धतीची माहिती प्रत्यक्ष प्रात्यिक्षकाद्वारे देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी आभार मानले. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कार्यालय, शाळा, पंचायत समितीसह ग्रामपंचायतींमध्ये उपक्रम होत आहेत.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळा