शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ, घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:16 IST

महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला.

अंबाजोगाई ( बीड) , दि. 21: महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी  व त्यांच्या पत्नी सरोजा स्वामी यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  

२१ सप्टेंबर त ३० सप्टेंबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. गुरुवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व त्यांच्या पत्नी  सरोजा यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर, सचिव भगवानराव शिंदे, देवीचे पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त, माजी आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, बालासाहेब लोमटे, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, अक्षय मुंदडा, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी यांच्यासह मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

दर्शनासाठी सर्वांना समान न्यायमहाराष्ट्रातील बहुतांशी तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शनासाठी स्वतंत्र पास, व्ही.आय.पीं.ची स्वतंत्र व्यवस्था अन्यथा स्वतंत्र दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली जाते. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत शक्तीपीठ असूनही इथे दर्शनासाठी सर्वांना समान न्याय आहे. पुरुषांची व महिलांची स्वतंत्र रांग असून सर्वांना समान दर्शन  हा वेगळा उपक्रम योगेश्वरी देवल कमिटीने अस्तित्वात आणला आहे. अशी माहित योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.  तसेच नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सलग नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.