शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत; आडसकरांचा विजय निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:53 IST

फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी रांजवण यांची मुलाखत : महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम; शेतकरी भाजपवर खूष; सर्वच जण लागले प्रचारात कामाला

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मोहन जगताप व त्यांचे कार्यकर्ते मागील आठ दिवसांपासून आडसकरांच्या कामाला जोमाने लागले आहेत. महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम आहे. फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझे वडील सोनाजीराव रांजवण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील , दादासाहेब रांजवण व इतर काही जणांना हा साखर कारखाना उभा करायचा होता व त्या दृष्टीने त्यांनी प्रक्रि या सुरू केली होती. त्यात आमचे वडील हे संस्थापक अध्यक्ष होते. परंतु सुंदरराव सोळंकेसाहेब हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याकडे काहीतरी पद असावे म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना कारखान्याचे चेअरमन केले. त्यावेळी माझ्या वडीलांनी मोठ्या प्रमाणात शेअर गोळा करून कारखाना उभारणीसाठी योगदान दिलेले आहे.रमेश आडसकर हे सक्षम आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात सिद्ध होऊ शकतात. तसेच रमेश आडसकरांनी एमआयडीसीमध्ये तात्काळ उद्योग आणल्यास युवकांना नोकरीची संधी मिळू शकते, रुग्णांची संख्या पाहता उपजिल्हा रूग्णालय हे तात्काळ होणे आवश्यक आहे व ते तात्काळ हे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. एव्हाना आमची मागणी देखील तशीच आहे. माजलगाव तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा नक्कीच आडसकर हे सोनं करून दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.वडील सोनाजीराव रांजवण यांना वैद्यकीय अधिकाºयाची नोकरी सोडून राजकारणात आणल्यानंतर सुरु वातीला सुंदरराव सोळंके यांचे विश्वासू म्हणून त्यांनी चांगले काम केले परंतु त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला त्यावेळी देखील विरोध केला म्हणून ते अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना तब्बल १५ ते २० वेळा सोनाजीराव यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. मात्र वडिलांनी आपल्या मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवत प्रत्येक वेळा आलेला अविश्वास परत लावला परंतु असे असतानाही प्रकाश सोळंके हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आम्ही त्यांची साथ सोडली नाही मात्र आता आम्हाला टाळण्याचा ‘कळस’ झाल्याने आम्हाला आमची नवीन वाट शोधावी लागली, असे तेम्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांव