शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दोनऐवजी एक फूट रुंदीच्याच बनविल्या नाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

माजलगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष : निकृष्ट कामाच्या नागरिकांच्या तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहरात अनेक ठिकाणी नाली बांधकाम करण्यात ...

माजलगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष : निकृष्ट कामाच्या नागरिकांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : शहरात अनेक ठिकाणी नाली बांधकाम करण्यात येत आहे. त्यात अनेक ठिकाणच्या नाल्यांचे काम अतिशय निकृष्ट होत आहे. श्रीकृष्णनगर भागात बनविण्यात आलेल्या नाल्या अरुंद झाल्या आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नागरिकांनीही तक्रारी केल्या आहेत.

माजलगाव नगरपालिकेने स्वतःच्या कामावर विश्वास नसल्यामुळे २२ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. सध्या शहरातील सर्व प्रभागांमध्ये नाली व रस्त्याची कामे त्यातून सुरू आहेत. नाली व रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. याकडे ना नगरपालिकेचे लक्ष आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे. त्यामुळे बोलायचे कुणाला? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. संबंधित गुत्तेदार नगरसेवकाचेच ऐकत नसेल, तर नागरिकांचे काय ऐकणार. कोणीच काही बोलायला तयार नसल्यामुळे गुत्तेदाराने बोगस कामाचा सपाटाच सुरू केला आहे.

शहरातील श्रीकृष्णनगर भागात १७० मीटर नाल्याचे बांधकाम केले. दुसरीकडे या नाल्याची रुंदी कमीत कमी दोन फुटाची आहे. संबंधित गुत्तेदाराने या नालीची एक फुटापेक्षाही कमी रूंदी ठेवली आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी नाली बांधकाम थांबवले आहे. .... श्रीकृष्णनगर भागात नाली बांधकाम सुरू असतानाही नगरपालिकेच्या अभियंत्यास याबाबत माहिती नाही. याबाबत संबंधित अभियंते काहीच बोलण्यास तयार नाहीत. संबंधित गुत्तेदाराला या नाली बांधकामाचे अदयाप बिल दिलेले नाही. त्याने जी नाली केली आहे, ती तोडून त्यास पुन्हा नाली करण्यास सांगण्यात येईल.

- शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव.

===Photopath===

070621\3141img_20210529_124517_14.jpg~070621\3141img_20210529_124434_14.jpg

===Caption===

माजलगाव शहरातील श्रीकृष्ण नगर भागात बनविण्यात आलेल्या अरुंद नाल्या.