शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीत भूगर्भातून गूढ आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गूढ आवाजाच्या भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. घटनेची माहिती समजताच उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवून काळजी घेण्याचे आवाहन केेले.

अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. या आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कायमच असा आवाज सातत्याने येऊ लागल्याने या घटनेची माहिती केंद्रेवाडीच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी प्रशासनास दिली. मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील व महसूलच्या पथकाने केंद्रेवाडी येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. असे आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

...

सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी कच्या घरात न थांबता पक्या घरात थांबावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या गूढ आवाजासंदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञांनाही माहिती दिली आहे. ते या भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत, असे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले, तर ज्या ग्रामस्थांकडे पक्के घरे नाहीत अशा ग्रामस्थांना शाळेत राहण्याची सुविधा गावच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

...

३३ वर्षांपूर्वीही आले होते गूढ आवाज

केंद्रेवाडी व परिसरातील गावांमध्ये अशा प्रकारचे गूढ आवाज ३३ वर्षांपूर्वीही आले होते. त्या काळात अनेक जुनी घरे पडली होती. त्यानंतर १९९१ साली किल्लारी व परिसरात भूकंप झाला होता. असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा असे आवाज येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

...

भूजलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी : मुंदडा

केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातून गूढ आवाज येत आहे. मध्यरात्री मोठा आवाज झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गूढ आवाजाबाबत भूजल सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांना त्वरित पाहणी करण्यासाठी केंद्रेवाडीत पाठवावे. उच्चस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

....