शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन देणाऱ्या डोंगर परिसरात पालिकेचा कचरा डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

परळी : नगरपालिकेने आठ दिवसांपासून डोंगरावरील नवीन जागेत कचरा डेपो सुरू केल्याने सकाळी व सायंकाळी ...

परळी : नगरपालिकेने आठ दिवसांपासून डोंगरावरील नवीन जागेत कचरा डेपो सुरू केल्याने सकाळी व सायंकाळी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. संतप्त कार्यकर्ते व नागरिकांनी शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडे याविषयावर गाऱ्हाणे मांडून लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या या प्रश्नाची तातडीने दखल घेत पंकजा मुंडे यांनी या नवीन कचरा डेपोची तातडीने पाहणी केली. या प्रश्नाकंडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परळी शहराबाहेर नंदागौळ रस्त्यावरील खदान परिसरात नगर परिषदेकडून होणारा कचऱ्याचा साठा परिसरातील नागरिक, वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पंकजा मुंडे यांची निवासस्थानी भेट घेत समस्या मांडली. कचरा डेपोच्या बाजूला वनखात्याची जमीन असल्याने तिथे वन्यजीवांचा संचार असतो. या कचरा डेपोमुळे नागरिकांसह वन्यजीवांचेही आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या रक्षणासाठी या विषयात गांभीर्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही मुंडे यांनी दिली. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, आश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, योगेश पांडकार, नितीन ढाकणे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे व स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

पहिला भरला म्हणून दुसरा डेपो

शहराजवळील नंदागौळ रोडवरील कचरा डेपो भरला म्हणून चक्क शेजारील डोंगरावर परळी नगरपालिकेने नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. या डोंगरावर शहरातील नागरिक रोज सकाळी संध्याकाळ फिरायला जातात. तिथेच कचरा डेपो केल्यामुळे स्वच्छ हवा मिळण्याचे ठिकाणही प्रशासन प्रदूषित करीत आहे. या डोंगरावर संरक्षित प्राणी म्हणून नोंद असलेले हरीण, काळवीट, मोर, विविध पक्षी, प्राणी यांचा मुक्त संचार असतो. या प्राण्यांनाही या कचरा डेपोमुळे धोका निर्माण झाल्याचे कार्यकर्ते व नागरिकांनी सांगितले.

------

310721\sanjay khakare_img-20210731-wa0034_14.jpg~310721\sanjay khakare_img-20210731-wa0035_14.jpg