शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात महावितरणकडे विजेच्या साहित्याचा तुटवडा; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षांने उद्भवली परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:15 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे.

बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने फिल्डवर असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना ग्राहकांना तोंड देताना नाकीनऊ आल्याचे दिसते. 

ग्रामीण भागातील विद्यूत खांब व तारा जीर्ण झालेल्या आहेत. या तारांची आणि खांबाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्तीच झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहायक व कनिष्ठ अभियंत्यांकडून वरिष्ठांकडे वारंवार साहित्याची मागणी केली जाते, परंतु त्यांच्याकडून याकडे विविध कारणे सांगून बगल दिली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुर्लक्षामुळे वीज  पुरवठा विस्कळीत होत असून रात्ररात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.

एकीकडे वीज बील वसूलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जातो. कारवाईची भाषा केली जाते, परंतु याच ग्राहकांना महावितरणकडून सुरळीत सेवा दिली जात नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

ढेपाळलेला कारभार सुरळीत करादरम्यान, फिल्डवर काम करणारे, सहाकय अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. या अधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिल्यावर वरिष्ठ त्यांना धारेवर धरतात. तर साहित्य उपलब्ध नाही, असे ग्राहकांना सांगितले, तर त्यांना हे कारणे सांगतात असे वाटते. आणि यातून त्यांच्यात वाद होतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. दिवसेंदिवस महावितरणचा कारभार ढेपाळत चालला आहे. यावर तात्काळ कारवाई करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण