शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गावांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे धरणात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:21 IST

शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगाव(बीड), दि. 23 : शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

माजलगाव धरणाचा पाया ज्या ११ गावाचा मालमत्ते वर उभा आहे आज त्याच पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. माजलगाव नगर परिषद व ११ गावच्या ग्राम पंचायत यांच्यात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चावरून वाद सुरु आहेत. यामुळे मागील 20 दिवसांपासुन या गावांचा पाणीपुरवठा नगर परिषदेने बंद  केला आहे. पाणीपुरवठा सुरूळीत करा या मागणीसाठी रेणापुरी, शेलापुरी, ब्रह्मगाव, चिंचगव्हान, काडीवडगाव,नागझरी, नांदुर खानापुर, या सह ११ पुनर्वसत गावांनी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा प्रशासनास इशारा दिला होता. पंरतु अद्याप प्रशासन व न.प.पाणीपुरवठा सुरुळीत न करुन आंदोलनाकडे  साफ दुर्लक्ष केले.

यामुळे या गावचे ग्रामस्थ मुक्तीराम आबुज,गणेश मारगुडे, शिवाजी आबुज, विनोद आबुज,पंडीत आबुज,पांडुरंग आबुज, पवण मुळे, विकास कांबळे, आनिल कांबळे, गोविंद चांभारे, गोरख आबुज, सचिन आबुज, सोमेश्वर आबुज, धनंजय आबुज यांनी माजलगाव धरणात उतरून  न.प.व प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास  आंदोलनकर्त्यानी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व गटविकास आधिकारी चव्हाण यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्याना समजावून  सांगत धरणातुन बाहेर काढून तहसील कार्यालयात चर्चेसाठी आणले आहे.