केज : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी बिनविरोध काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नानंतर मोटेगाव, घाटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली, तर पाथरा ग्रामपंचायतीचे पाच सदस्य व सुकळीचे तीन सदस्य बिनविरोध आले आहेत. बिनविरोध आलेल्या उमेदवारांमध्ये मोटेगाव येथील रामकृष्ण विश्वनाथ पौळ, नितीन धोंडिबा बचुटे, वर्षा विनोद पौळ, अर्चना अण्णासाहेब पौळ, अनिता संदीपान बचुटे यांचा समावेश आहे, तर घाटेवाडी येथील अनिता शिवाजी गायकवाड, अंकुश पिलाजी रोमण, जिजाबाई अंकुश रोमण, जनाबाई बारीकराव गरबडे, सविता अभिमान शिंदे, प्रभाकर बाबूराव धुमक, सखूबाई मारुती काळे, वर्षा सतीश गिरी, लिंबा भानुदास हालकडे या उमेदवारांचा समावेश आहे. पाथरा गावातील नानासाहेब विठ्ठल पवार, आशा व्यंकट पवार, सखाराम मलिकार्जुन पांगे, मीरा पांडुरंग राऊत, छाया मेघराज राऊत, तसेच सुकळी गावातील ऊर्मिला लालगीर गिरी, बालाजी हरिभाऊ गिरी, शिल्पा अशोक मस्के याच उमेदवारांचे अर्ज आल्याने ते बिनविरोध विजयी झाले. केज तालुक्यातील २ ग्रामपंचायत बिनविरोध व पाथरा गावातील पाच सदस्य, तसेच सुकळी गावातील ३ सदस्य बिनविरोध काढल्याबद्दल जि.प. उपाध्यक्ष सोनवणे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
मोटेगाव, घाटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST