शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते ...

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते १७ ऑगस्ट दरम्यान अपेक्षित साधारण पावसाच्या तुलनेत जादा पाऊस झाला आहे. तरीही धरणांमध्ये पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंतच आहे. तर खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे; मात्र पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकेही सुकण्याच्या परिस्थितीत आहेत. काही ठिकाणी तर पिके पिवळी पडून कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बीड खरिपाचे सर्वधारण क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्टर असून, ७ लाख ४० हजार ७७१ हेक्टरात यंदा पेरा झाला आहे. हे प्रमाण ९९.२९ टक्के इतके आहे. जूनमध्ये दमदार हजेरी लावणारा पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गायब झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ३ लाख ५७ हजार ५५३ असून, ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ९० हजार ७४८ हेक्टर असून, १४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व त्यापाठोपाठ कापसाला बसणार आहे.

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ३३१.८ मिमी. प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४२१.१

२) पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)

कापूस - २,५१,१५६

सोयाबीन -२,८४,९७४

उडीद -४४,८४२

मूग -२१,२९९

तूर - ७१,९११

३) पाणीसाठा ४५ टक्क्यांवर

लघू - २८

मध्यम - ५०

मोठे - २९

४) उसनवारी कशी फेडणार?

आष्टी तालुक्यातील धानोरा मंडळात यावर्षी सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके ७५ टक्के वाया गेली आहेत. त्यामुळे नुकसान होणार असून, खरिपासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा? -- संजय चव्हाण, शेतकरी, हिवरा, ता. आष्टी.

-------------

सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला तर पीक अतिशय जोमात येते; पण तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने जोमात आलेले सोयाबीन उन्हामुळे कोमेजत आहेत. उसनवारी करून शेतीसाठी खर्च केला; पण आता फेडायची कशी, याची चिंता आहे. - धोंडीराम राठोड, लवूळ, ता. माजलगाव.

-----

यंदा सोयाबीनचे पीक जोमात आहे. पावसाअभावी पिकाला धोका निर्माण झाला आहे. हलक्‍या जमिनीतील सोयाबीन सुकत आहे. काळ्या जमिनीतील सोयाबीन मात्र तग धरून आहे. --- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.

---------