शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात आष्टी तालुक्यातील १२६६ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

कडा : थोड्या फार प्रमाणात राहिलेला कोरोना दुसऱ्या लाटेत हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना आता आकडा उतरणीला लागेल, अशी परिस्थिती ...

कडा : थोड्या फार प्रमाणात राहिलेला कोरोना दुसऱ्या लाटेत हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना आता आकडा उतरणीला लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता कोरोना गेला या अतिविश्वासाने नियमांचे कसलेच पालन न केल्याने आष्टी तालुक्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असुन जुलै महिन्यात आष्टी तालुक्यातील १२६६ जण कोरोनाबाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. हे संकट दिवसेंदिवस

ओढवत चालल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचा फक्त दिखाऊपणा असल्याने नियमांचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून त्याचबरोबर महसूल, पोलीस प्रशासनाच्या दिमतीने दिवसरात्र मेहनतीने आकडा उतरणीला लागला होता. तुरळकच रुग्ण आढळून येत होते. पण, नागरिकांनी नियमाला पायदळी तुडवत प्रशासन निष्क्रिय होऊ लागल्याने आता हा दररोज वाढत चाललेला आकडा डोकेदुखी होऊ लागला आहे.

या महिन्यात तालुक्यातील १२६६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासन आता रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहे, निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पण, तरीही नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे फक्त प्रशासन बोलत असले, तरी प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला जबाबदार कोण, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रा. संजय खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.