शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पैसा झाला खोटा, दहा रुपयांचे नाणे चालेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

१२०० बीड : कुठलेही आदेश नाहीत तरीही सांभाळायचा ताप नको म्हणून रिझर्व्ह बँकेने जारी केलेले दहा रुपयांचे नाणे नागरिकांनी ...

१२०० बीड : कुठलेही आदेश नाहीत तरीही सांभाळायचा ताप नको म्हणून रिझर्व्ह बँकेने जारी केलेले दहा रुपयांचे नाणे नागरिकांनी आपल्या व्यवहारातून बाद केल्यासारखेच दिसत आहे. मागील तीन वर्षांपासून दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने हे नाणे खरे असूनही खोट्यासारखे ठरत आहे. लहान असो वा मोठा व्यावसायिक कोणीच दहाचे नाणे चलनात वापरत नाहीत. तर दुसरीकडे नागरिक हे नाणे स्वीकारत नाहीत. याबाबत बँकांचा कानोसा घेतला असता, अनेक बँकांचे स्टोअर रूम फुल्ल झाले आहेत.

कुठल्याच नाण्यावर बंदी नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नाण्यांवर बदी नाही. तरीही दहा रुपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत नसल्याने पेच आहे. दहा रुपयांच्या नाण्याबाबत असलेला संभ्रम रिझर्व्ह बँक व बँकांकडून होत असला तरी दहा च्या नाण्यावर विश्वास ठेवायला लोक धजावत नाहीत.

कोणती नाणी नाकारली जातात

सध्या चलनात पन्नास पैसे, एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांची नाणी आहेत. मात्र पन्नास पैसे व दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास जो तो नकार देत आहे. इतर नाणी मात्र चलनात वापरली जात आहे. तर वीस रुपयांचे नाणे नवे असल्याने चलनात सध्या ते वापरले जाते.

बँकांमध्येही नाण्यांचा मोठा साठा

दहा रूपयांचे नाणे लोक व्यवहारात आणत नसल्याने बहुतांश व्यापारी व नागरिक त्यांच्याकडील नाणी बँकेत जमा करतात. बँकांमध्ये या नाण्याची मोठी आवक होत असल्याने क्वाइन बॅगने स्टोअर रूम भरले आहेत. त्यामुळे इतर करन्सी ठेवायला जागा अपुरी पडत आहे. कोट्यवधींच्या घरात या नाण्यांची किंमत असली तरी त्यांचे वजन मात्र बँकांना झेपत नसल्याची स्थिती आहे.

--------

बीड जिल्ह्याच्या बाहेर दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. तेथे सुटे पैसे देताना या नाण्याची देवाणघेवाण होते. मात्र बीड जिल्ह्यात या नाण्याद्वारे देवाणघेवाण टाळली जाते. काही बँकांकडून हे नाणे स्वीकारताना क्वाईन काउंटिंग मशीन नसल्याने नाणे मोजण्याचा ताप नको, वेळ व्यर्थ जायला नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारण्याचे टाळले जाते. - सीताराम बांगड, बीड.

----------

दहा रुपयांचा ठोकळा दुकानदार, विक्रेता कोणीच घेत नाहीत. त्यामुळे माझ्याकडे नाणी असूनही ती व्यवहारात आणता येत नाही. बाहेरगावी गेलो की सुट्या पैशांच्या रूपाने दहा रुपयांचे नाणे दिले जाते. तेथेदेखील दहाचे नाणे आमच्याकडे चालत नाही, असे सांगावे लागते. भाजीविक्रेता, लहान व्यावसायिक, टपरी, हॉटेलवर दहाचे नाणे वापरात आल्यास हे नाणे चलनात फिरू शकेल.

शहादेव जाधव, बीड.

-------------