शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

---------- लघु प्रकल्पांची दुरूस्ती रखडली अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्यावतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी ...

----------

लघु प्रकल्पांची दुरूस्ती रखडली

अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्यावतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघु प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी, मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसवणे, गेटची दुरूस्ती अशा कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने दुरूस्तीची कामे रखडली आहेत.

---------------------

आठ दिवसांआड पाणीपुरवठा

अंबाजोगाई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळीअवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानीपणे पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

---------------

महावितरणकडून बिलांचा ग्राहकांना शॉक

अंबाजोगाई : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कमी हाॅर्सपॉवरच्या विद्युत मोटारी आहेत अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिले आली आहेत. महावितरणच्या या वीजबिलाच्या शॉकने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

---------

श्वानांना चर्मरोग; नागरिकांना त्रास

अंबाजोगाई : शहर व परिसरात अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांच्या वाढत्या संख्येचा मोठा त्रास शहरवासीयांना होत आहे. मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेले हे श्वान रहदारी करणाऱ्या व्यक्तींना भीतिदायक ठरू लागले आहेत. यातील अनेक श्वानांना चर्मरोगाची लागण झाल्याने याचा शहरवासीयांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

-----------