शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बीडमधील वडवणी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: January 10, 2017 15:15 IST

गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर गावातीलच इसमाने बलात्कार केला.

ऑनलाइन लोकमत
वडवणी, दि. १० -  गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर गावातीलच लक्ष्मण शामराव मुंडे या ५५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. 
 
पीडित मुलीचे आई- वडील ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यातील बिदर येथे गेले होते. शिक्षणासाठी मुलगी गावी आजोबांकडे राहते. सोमवारी सहावीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या लहान बहिणीसमवेत गायी चारण्यासाठी वाघदरी शिवारात गेली होती. गावातीलच लक्ष्मण मुंडे याने तिला कापसाच्या शेतात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. दरम्यान, पीडित मुलीने आपल्या आजोबांना घडला  प्रकार सांगितला. त्यानंतर वडवणी ठाण्यात तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला. 
 
फौजदार रमेश रूपेकर, पोहेकॉ एन. एन.सोनवणे, एस. एस. गाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लक्ष्मण मुंडे याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून मुलीचे आई- वडील बीडकडे रवाना झाले आहेत.