शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कामावर नसलेल्या मजुरांच्या नावे उचलले लाखो रुपये ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:53 IST

येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात वनीकरणाच्या सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या मजुरांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम उचलली असल्याने त्या वीस मजुरांनी केजच्या सामाजिक वनीकरण विभागाचे असे कोणती कामे केली होती, ज्याच्या मोबदल्यात ही रक्कम परजिल्ह्यातील मजूरांच्या नावे अदा करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : केज सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठांकडून संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना अभय ?

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात वनीकरणाच्या सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या मजुरांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम उचलली असल्याने त्या वीस मजुरांनी केजच्या सामाजिक वनीकरण विभागाचे असे कोणती कामे केली होती, ज्याच्या मोबदल्यात ही रक्कम परजिल्ह्यातील मजूरांच्या नावे अदा करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.केज येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या केज येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांनी तालुक्यात वृक्ष लागवडीसह रोपवाटिकेतील पिशव्यात माती भरण्यासाठी व माती भरलेल्या पिशव्यांमध्ये बियाणे टाकण्यासाठी स्थानिक मजुरांना दूर ठेवत, बाहेर जिल्ह्यातील मजूर कामावर नसताना त्यांच्या नावे करोडो रुपयांची बिले उचलून भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या आहेत.येथील सामाजिक वनीकरणच्या वन परिक्षेत्र अधिकाºयाने आपल्या पदाचा गैरवापर करत सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या व बाहेरच्या जिल्ह्यातील मजुरांच्या नावे लाखो रुपयांची मजुरीचे पैसे उचलेले आहेत.दरम्यान, हे मजूर कामाला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, तसेच या मजुरांनी सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीसह रोपवाटिकेत अशी कोणती कामे केल्याने त्यांना त्यांच्या कामाच्या मजुरीपोटी लाखो रुपये देण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान केज येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तालुक्यात वृक्षलागवडीच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य बजरंग सोनवणे यांनी मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.मात्र, केज येथील सामाजिक वनीकरण विभागात करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारात सामाजिक वनीकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत केल्याने या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Beedबीडfraudधोकेबाजी