शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेतील शिक्षकांचे पाच महिन्यांपासून विनावेतन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST

दरवर्षी वेतनाचा सरसकट निधी वर्षाच्या सुरुवातीलाच ६० टक्‍क्‍यांपर्यंत वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत होता, मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये वित्त ...

दरवर्षी वेतनाचा सरसकट निधी वर्षाच्या सुरुवातीलाच ६० टक्‍क्‍यांपर्यंत वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत होता, मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये वित्त विभागाकडून दर महिन्याला केवळ ५ ते १० टक्के निधीच देण्यात येत आहे. या तुटपुंजा निधीमध्ये एक महिन्याचा पगारही अनेकदा होत नाही, अशा वेळी तो निधी परत जातो किंवा २ ते ३ महिन्यापर्यंत दुसऱ्या निधीची प्रतीक्षा करावी लागते. तेव्हा कुठे या शिक्षकांचे एक महिन्याचे वेतन निघते. अशातच तब्बल गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सैनिकी शाळेवरील आदिवासी तुकडीवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे.

सैनिकी शाळा यांच्या आदिवासी तुकडीवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ कोटी ९० लाख ९६ हजार रुपयांची गरज असताना केवळ २५ टक्के निधी अर्थात ३ कोटी ७५ लाख निधी मंजूर केला आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील सैनिकी शाळा मधील कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ च्या ५ महिन्यांचे पगार थकीत आहेत. पगाराविषयी या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, गृहकर्जाचे हप्ते तसेच विविध कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे दंडाचा नाहक आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. निधी मंजूर होऊनही गेल्या २५ दिवसांपासून तो वितरणाच्या अभावी शालेय शिक्षण विभागाकडे पडून आहे.

तांत्रिक अडचणी सोडवून हा निधी लवकरात लवकर वितरित करावा व कर्मचाऱ्यांच्या अनियमित वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष २२०२ एच ९७३ चे ‘प्लॅन टू नाॅन प्लॅन’ मध्ये वर्ग होणे गरजेचे असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस. ए. यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी तुकडीवरील शिक्षकांनी बीड जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांना निवेदन देऊन आपल्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित या अडचणी न सुटल्यास राज्यभरातील शिक्षक राज्यभर आंदोलन करणार असल्याचे प्रत्येक जिल्ह्यातून आदिवासी तुकडी वरील शिक्षक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठवण्यात आले आहे.