शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेतील शिक्षकांचे पाच महिन्यांपासून विनावेतन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : राज्यातील १९ जिल्ह्यातील २१ सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ४ ...

बीड : राज्यातील १९ जिल्ह्यातील २१ सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून निधी वितरणास दिरंगाई होत असून लवकरात लवकर आमचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे सैनिकी शाळेचे प्राचार्य डाके एस. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांच्याकडे केली आहे.

याबाबत लवकर निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यातील आदिवासी तुकडीचे शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरवर्षी वेतनाचा सरसकट निधी वर्षाच्या सुरुवातीलाच ६० टक्‍क्‍यांपर्यंत वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत होता, मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये वित्त विभागाकडून दर महिन्याला केवळ ५ ते १० टक्के निधीच देण्यात येत आहे. या तुटपुंजा निधीमध्ये एक महिन्याचा पगारही अनेकदा होत नाही, अशा वेळी तो निधी परत जातो किंवा २ ते ३ महिन्यापर्यंत दुसऱ्या निधीची प्रतीक्षा करावी लागते. तेव्हा कुठे या शिक्षकांचे एक महिन्याचे वेतन निघते. अशातच तब्बल गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सैनिकी शाळेवरील आदिवासी तुकडीवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे.

सैनिकी शाळा यांच्या आदिवासी तुकडीवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ कोटी ९० लाख ९६ हजार रुपयांची गरज असताना केवळ २५ टक्के निधी मंजूर केला आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील सैनिकी शाळा मधील कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ च्या ५ महिन्यांचे पगार थकीत आहेत. पगाराविषयी या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, गृहकर्जाचे हप्ते तसेच विविध कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे दंडाचा नाहक आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. निधी मंजूर होऊनही गेल्या २५ दिवसांपासून तो वितरणाच्या अभावी शालेय शिक्षण विभागाकडे पडून आहे.

तांत्रिक अडचणी सोडवून हा निधी लवकरात लवकर वितरित करावा व कर्मचाऱ्यांच्या अनियमित वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष २२०२ एच ९७३ चे ‘प्लॅन टू नाॅन प्लॅन’ मध्ये वर्ग होणे गरजेचे असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.

सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस. ए. यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी तुकडीवरील शिक्षकांनी बीड जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांना निवेदन देऊन आपल्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित या अडचणी न सुटल्यास राज्यभरातील शिक्षक राज्यभर आंदोलन करणार असल्याचे प्रत्येक जिल्ह्यातून आदिवासी तुकडी वरील शिक्षक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठवण्यात आले आहे.