शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणारे सदस्य होणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल ३१९ सदस्य अपात्र करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे३१९ ग्रामपंचायत सदस्य : मुदतवाढ होऊन देखील केले नाही प्रमाणपत्र दाखल

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल ३१९ सदस्य अपात्र करण्यात येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षे मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र सदस्यांनी वाढवलेल्या मुदत गांभिर्याने न घेता २ वर्ष उलटल्यानंतर देखील, जातवैधता प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. अशा निवडून आलेल्या ३१९ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीमध्ये राखिव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यापुर्वी हे प्रमाणत्र सादर करण्यासाठी ६ महिण्यांची मुदत होती. मात्र, ज्यांनी ६ महिन्यात असे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात याचीका दाखल केली होती. यावर निकाल देताना प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ३ महिन्यांपूर्वी दिले होते, याचा फटका हजारो सदस्यांना बसणार होता. त्यामुळे राज्यशासनाने वेगळा आदेश काढून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत १ वर्ष केली होती.अध्यादेश काढून वर्ष उलटल्यानंतर देखील, अनेकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अशा ३१९ सदस्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. या सर्वांच्या अपात्रतेचे आदेश कोणत्याही क्षणी काढले जातील अशी सूत्रांची माहिती आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह प्रशिक्षणासाठी परदेश दौºयावर आहेत. ते रुजू झाल्यानंतर या सदस्यांचे अपात्रेचे आदेश काढले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘यांना’ मिळाला दिलासाजातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी शासनाने काढलेल्या नवीन आदेशानूसार दोन वर्ष मुदत आहे. त्यामुळे २०१६ या वर्षाच्या शेवटी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमधील विजयी उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे या अपात्रतेच्या कारवाईमधून त्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Beedबीडgram panchayatग्राम पंचायतCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र