शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:58 IST

माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ पवार यांनी वज्रमूठ आवळली.

ठळक मुद्देप्रकाश सोळंके समर्थकांचे एकमत : विकासासाठी प्रकाशदादांसोबत राहण्याचा वडवणीत निर्धार

वडवणी : गेल्या पाच वर्षांपासून जनतेने मतदार संघाबाहेरील उमेदवाराला लोकप्रतिनिधीत्व दिले. मात्र त्यांनी विकासाकडे पाठ फिरविली. बाहेरच्या मतदार संघातून येणा-या उमेदवारांना स्थानिक प्रश्नांची जाण व विकासकामाचे देणंघेणं नसते, याचा अनुभव जनतेला आला आहे. त्यामुळे आता माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ पवार यांनी वज्रमूठ आवळली.मागील पाच वर्षात खुंटलेला विकास पुन्हा जोमाने करण्यासाठी शहरातील विखुरलेल्या नेते मंडळींची मोट बांधण्यात प्रकाश सोळंके अखेर यशस्वी ठरले. शुक्रवारी समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोळंके यांनी त्यांच्या कार्यकाळातील पंधरा वर्षातील विविध विकास कामांचा आलेख मांडला. उर्वरित विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पाठपुरावा देखील करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.सोळंके म्हणाले, माजलगाव विधानसभा निवडणुकीत वडवणी तालुक्यातील मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरत असते. अत्याधुनिक एमआयडीसी, बस स्थानक, वडवणीच्या बाजूने रिंग रोड, व्यायामशाळा, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, मंजूर ग्रामीण रूग्णालय उभारणीचे काम करणार असल्याचे सोळंके म्हणाले.यावेळी माजी सभापती सुधीर ढोले, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ मेत्रे, जिल्हा परिषद सर्जेराव आळणे, संभाजी शिंदे, गंपू पवार, भीमराव उजगरे, वडवणी शहराध्यक्ष विठ्ठल भुजबळ, भानुदास उजगरे, अंकुशराव शिंदे, गुलाब राऊत, संतोष पवार, बाळासाहेब नागरगोजे, बुवासाहेब शिंदे, डॉ. खान, नगरसेवक विनोदकुमार नहार, श्रीराम मुंडे, विश्वास आसलकरसह सोळंके यांना मानणारे मतदार उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंके