दाखल झाला. गुरुवारी तहसील कार्यालय, परळी व शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दहा पोलीस अधिकारी व पन्नास पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. येथील पंचायत समितीच्या सभापती ऊर्मिला गिते यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव प्रस्ताव ११ पैकी नऊ सदस्यांनी दाखल केला आहे. यावर विचार-विनिमय करण्यासाठी ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता परळी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष सभा परळी तहसील कार्यालय येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सभापती पदाच्या विरोधात अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सभापती ऊर्मिला गिते असून, त्यांच्याविरोधात पंचायत समितीच्या राष्ट्रवादी व भाजपाच्या ९ सदस्यांनी मिळून अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे २२ डिसेंबर रोजी दाखल केला आहे. त्यानुसार अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसील ही विशेष सभा घेत आहे. उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंचायत समिती सभापतीविरुद्ध अविश्वास ठराव पारित होण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीच्या सभापतीवरील अविश्वास ठरावासंदर्भात आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST