शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:20 IST

विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला.

ठळक मुद्देविणेक-याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ

परळी (जि. बीड) : विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला.

सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील गंगापिंप्री येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते़ या सप्ताहामध्ये वैजनाथ रंगनाथ रोडे यांनी लिंबाजी यांना सात दिवसांसाठी १५०० रुपये ठरवून विणेकरी म्हणून बोलावले होते़ तसेच सातभाई यांची रोडे यांच्या घरी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती़.

४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरावरील सज्जामध्ये ठेवलेल्या १५ ते २० ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे़, असे म्हणून ग्रंथ पाहत असताना ग्रंथाच्या पाठीमागे ठेवलेली पाच तोळे सोन्याची दागिन्याची पिशवी चोरून नेली़, अशी तक्रार वैजनाथ रोडे यांनी सोनपेठ पोलिसांकडे दिली. त्यावरुन ११ डिसेंबर रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात लिंबाजी यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला होता.

खोटा गुन्हा दाखल केला म्हणून लिंबाजी तणावग्रस्त होते. मंगळवारी रात्री शेवटचा राम राम म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. त्यामुळे अख्ख्या गावाने त्यांची समजूत घातली. तरीही समाधान न झाल्याने त्यांनी बुधवारी सकाळी एकादशीच्या दिवशी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. उसाला पाणी देण्यासाठी त्यांचे भाऊ वाल्मिक सातभाई सकाळी गेले असता ही घटना उघडकीस आली. सकाळी ११ च्या सुमारास लिंबाजी यांचा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, पाच भाऊ असा परिवार आहे.

४० वर्षांची विणेकरी सेवालिंबाजी सातभाई पाच भावांत सर्वांत मोठे. त्यांना दीड एकर जमीन आहे. एक मुलगा शेती करतो तर दुसरा ऊसतोड कामगार आहे. लिंबाजी यांना गावात सर्वच जण माऊली म्हणून संबोधित होते. गेल्या ४० वर्षांपासून सप्ताहामध्ये राज्यभरात कोठेही ते विणा वावाजविण्यासाठी जायचे.

ग्रामस्थ आक्रमखोटा गुन्हा दाखल करणा-याविरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ, नातेवाईक आक्रमक झाले होते. माजी सरपंच माणिकराव सातभाई, भीमराव सातभाई, बबन सातभाई, अशोक सटाले, विनायक सातभाई, विजय लुगडे, वाल्मिक सातभाई आदींनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रोडेविरूद्ध गुन्हालिंबाजी सातभाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापिंपरी येथील वैजनाथ रोडे याच्याविरूद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लिंबाजी सातभाई यांचा मुलगा श्रीधर याने ही फिर्याद दिली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कैलास सपकाळ यांनी दिली.

खिशात डायरी अन् हरीपाठघटनास्थळी पोलिसांना लिंबाजी यांच्या शर्टच्या खिशात हरीपाठ आणि डायरी सापडली. डायरीत त्यांनी अनेक अभंगही लिहिलेले आढळून आले आहेत.

पोलिसांकडून झाली होती चौकशीलिंबाजी यांना शुक्रवारी सोनपेठ पोलीस ठाण्यात घेऊन या, असा निरोप सोनपेठच्या पोलिसांनी मोबाईलवरून त्यांच्या भावास दिला होता. भावाने हा निरोप लिंबाजी यांना सांगितला होता. सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ११ डिंसेबर रोजी सोनपेठचे पोलीस तडोळी गावात चौकशीसाठी आले होते, अशी माहिती वाल्मिक सातभाई यांनी दिली.