जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना खर्च करून उत्पादित केलेला भाजीपाला कमी दरात विकावा लागत आहे, नसता फेकून द्यावा लागत आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी असेच प्रकार झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. त्यामुळे आठवड्यापूर्वी शेतकऱ्यांनी मोफत भाजीपाला वितरण केले होते. सोमवारी पुन्हा तीच अवस्था असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बाजारात विकण्यासाठी आणलेला भाजीपाला फेकत संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे, अशी मागणी किसानसभेचे मोहन लांब यांनी केली. २६ मार्चपर्यंत प्रशासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची विक्रीची सोय न केल्यास तीव्र स्वरूपाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
===Photopath===
220321\img_20210322_173857_14.jpg
===Caption===
शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धारूर येथील छञपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बाजारात विकण्यासाठी आणलेला भाजीपाला फेकत संतप्त भावना व्यक्त केल्या.