शहरातील क्रांती नगर माहेर असलेल्या कोमल सचिन पेठे ( २७ ) हिचा सचिन दादाराव पेठे ( रा. गावसुद ता. जि. उस्मानाबाद ) याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगल्या प्रकारे नांदविल्यानंतर तिचा पती सचिन पेठे, सासू आशाबाई पेठे, सासरा दादाराव पेठे यांनी कोमलला घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला. मात्र तिने आई वडीलांची एक लाख रुपये देण्याची ऐपत नसल्याचे सांगून रक्कम आणण्यास नकार दिला. शेवटी ती पैसे घेऊन येत नसल्याने चिडलेल्या पती, सासू, सासऱ्याने तू चांगली नाहीस असे म्हणत तिला सतत शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. २४ फेब्रुवारी रोजी कोमलला घरातून हाकलून दिले. अशी फिर्याद कोमल पेठे हिने दिल्यावरून पती सचिन पेठे, सासू आशाबाई पेठे, सासरा दादाराव पेठे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.
विवाहितेला घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST