शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:41 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे.

ठळक मुद्देअंबाजोगाई, गेवराई, साळेगाव, लो. सावरगावात दवंडी देऊन गर्दी टाळण्याचे आवाहन

बीड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक संस्थांनी घेतला आहे. दरम्यान, धारुर व परळी येथे सोमवारी बाजार भरला. यापुढे मात्र बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना नागरिकांना दिल्या.अंबाजोगाई शहरातील आठवडी बाजार बंदअंबाजोगाई : शहरात मंगळवारी मोंढा परिसरात, शुक्रवारी मांडवा रोड, तर रविवारी यशवंतराव चव्हाण चौक येथे आठवडी बाजार भरतो. या सर्व बाजारातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तालुक्यात घाटनांदूर, ममदापूर, देवळा येथे ही आठवडी बाजार भरतो.हे सर्व बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत.परळीतील दोन्ही बाजार नेहमीप्रमाणे भरलेपरळी : येथील हायबे रोड, वैद्यनाथ बँक रोडवर दर सोमवारी भरणारा भाजीपाला व किराणा दुकानाचा आठवडी बाजार दर सोमवारप्रमाणे भरला. गुरांचा बाजारही वैद्यनाथ मंदिर समोरील जागेत भरला. गुरांच्या बाजारात आज गर्दी दिसून आली. नगर परिषदेच्या वतीने सोमवारचा परळीतील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीही सोमवारी दोन्हीही बाजार भरलेले होते. नगर परिषदेच्या वतीने अनाऊन्सिंगचे काम चालू असल्याची माहिती नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी दिली. शहरातील विविध बँकेतही गर्दी दिसून आली. वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची संख्या मात्र रोडावलेली दिसली.गेवराईचा बाजार बंदगेवराई : शहरात बुधवारी भरणारा सर्वात मोठा आठवडी बाजार बंद ठेवला असून, याच्या सूचना सर्व व्यापारी व नागरिकांना केल्याचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या बाजारात जवळपासच्या गावातील नागरिक व व्यापारी भाजीपाला, किराणा, कापड, बूट, चप्पल खरेदीसाठी येतात. हा आठवडी बाजार बंद राहणार असून, याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी या रोगापासून दूर राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जावू नये असे आवाहन येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सांगितले.साळेगावचा जनावरांचा आठवडी बाजार बंदकेज : तालुक्यातील साळेगाव येथे दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार भरतो. येथे गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी व खरेदीसाठी तालुक्यातील व बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा, कराड, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही व्यापारी व पशुपालक येत असतात. सदरील बाजार हा ३१ मार्च पर्यंत भरणार नाही. तसेच या बाबत पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही होणार असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव यांनी दिली.लो. सावरगावात दवंडीलोखंडी सावरगाव येथे बुधवारी भरणाऱ्या बाजारात परिसरातील श्रीपतरायवाडी, सनगाव, वरपगाव, हिवरा, डिघोळ अंबा, कोदरी, होळ, बोरी सावरगाव, लाडेगाव येथून शेतकरी, अंबाजोगाई येथून व्यापारी भाजीपाला घेऊन येतात. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने दवंडी देऊन बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे.पुढील बाजारापासून न येण्याच्या सुचनाधारूर : शहरात सोमवारी आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते आले होते. त्यांना विक्री करण्यास मुभा दिली मात्र शुक्रवारी भरणाºया बाजारापासून पुढील आदेश येऊपर्यंत आठवडी बाजार बंद राहतील व सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्याच्या सूचना नगरपालिकेच्या वतीने शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बाजारपेठेत व्यवहारावर यांचा परिणाम झाला आहे.

टॅग्स :BeedबीडMarketबाजार