शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात मराठवाडा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:15 IST

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातून सर्वाधिक ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्जसर्वात कमी प्रस्ताव ३९६ कोल्हापूर जिल्ह्यातून दाखल

बीड : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत  राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत.पीक विमा योजना जुलैमध्ये सुरु झाली. यंदा आॅनलाईन भरणा करण्याच्या पध्दतीमुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. कधी सर्व्हर डाऊन, कधी विजेचा तुटवडा,  कधी इतर तांत्रिक अडचणी, बॅँकेत अपुरे कर्मचारी या कारणांमुळे शेतकºयांना ताटकळावे लागले. त्यामुळे आॅफलाईन अर्ज भरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्यावर सेवाकेंद्रांवरुन विमा प्रस्ताव दाखल करण्याबाबत व त्याची स्वतंत्र नोंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. या कालावधीत पावसाने मोठी ओढ दिल्याने अखेरच्या दिवसापर्यंत पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होती.पीकनिहाय स्वतंत्र प्रस्तावाच्या नोंदीनुसार राज्यातून पीक विम्याचे एकूण ६२ लाख ३६ हजार ४९९ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. यात सर्वाधिक प्रस्ताव ११ लाख ६७ हजार २२३ बीड जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. सर्वात कमी प्रस्ताव ३९६ कोल्हापूर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत.चौकट -मराठवाड्यातून बीड ११ लाख ६७ हजार २२३, नांदेड ९ लाख ६० हजार ९१९, जालना ७ लाख ९६ हजार ९०२, लातूर ७ लाख ५२ हजार ७५०, परभणी ५ लाख ९२ हजार २६, उस्मानाबाद ३ लाख ७१ हजार ८७, औरंगाबाद ३ लाख ६३ हजार ७५१, हिंगोली २ लाख २३ हजार ३१२ प्रस्ताव दाखल झाले आहेत.४६ कोटींचा विमाबीड जिल्ह्यातील १८ बॅँकांच्या माध्यमातून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकºयांनी खरिपाचा विमा उतरविला. ३४ कोटी ९८ लाख ६९ हजार १२२ रुपयांचा हप्ता भरला. तर सीएससी सेंटरद्वारे २ लाख ७९ हजार ८५८ अर्ज दाखल झाले. आॅनलाइन व आॅफलाइन असा अर्जदारांनी जवळपास १२ कोटींचा विमा उतरविला आहे.