शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परिपूर्ण आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

बीड : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले होते. ...

बीड : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले होते. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या अहवालातील परिशिष्ट आणि जोडपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करून सर्वोच्च न्यायालयात सादर केले नाही, त्यामुळे कोर्टासमोर हा अहवाल परिपूर्ण नसल्याचे सिद्ध झाले. राज्य सरकारची ही हलगर्जी नडली. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आघाडी सरकारने गांभीर्याने हाताळला नाही. मराठा आरक्षण रद्द झाले. आजपर्यंतचा मराठा आरक्षणाचा लढा समाजानेच यशस्वी केला. यापुढेही मराठा आरक्षणाचा लढा चालूच राहील. ठोस, कायम आणि परिपूर्ण आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टी समाजाबरोबर उभी राहील. मराठा समाजाच्या आक्रोशाला पूर्ण साथ देणार, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नेते आ.आशिष शेलार यांनी दिले.

२ जून रोजी बीड येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मराठा आरक्षणसंदर्भात मराठा आरक्षण लढ्यातील निवडक कार्यकर्ते व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची संवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान अनेक मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून मराठा आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी केली.

आ. शेलार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भारतीय जनता पार्टीची प्रबळ इच्छा आहे. कोरोना परिस्थितीत रस्त्यावर न उतरता संवादाच्या माध्यमातूनसुद्धा लढा यशस्वी होण्यास निश्चित मदत होऊ शकते. मराठा आरक्षण कायद्याने यशस्वी होण्यासाठी समाजाने टिपण दिल्यास तिचा स्वीकार आणि अंमलबजावणी आम्ही निश्चित करू.

आजपर्यंत कालेलकर, बापट, खरे आणि मंडल असे आयोग येऊन गेले; परंतु कोणत्याही आयोगाने मराठा समाज मागास आहे, हे निर्देशित केले नाही. समाज मागास असल्याची बाब समोर आणली नाही. भाजपा सरकारने गायकवाड आयोगामार्फत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करून मराठा आरक्षणाचा पाया रचला; परंतु ज्यांना मराठा आरक्षणाबाबत आकस आहे, तेच आज सत्तेत असल्यामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकले नाहीत, असा आरोप आ. शेलार यांनी केला.

मराठा आरक्षण संवाद बैठकीला आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, सलीम जहांगिर, स्वप्निल गलधर, जगदीश गुरुखुदे, प्रा.नागरगोजे, संगीता धसे, भाजपा पदाधिकारी यांच्यासह बीडमधील विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी महेश धांडे, शैलेश जाधव, विठ्ठल बहिर, गणेश बजगुडे, विजय लव्हाळे, सचिन उबाळे, संतोष जाधव, भागवत मस्के आदि उपस्थित होते.

===Photopath===

020621\02bed_13_02062021_14.jpg

===Caption===

आशिष शेलार