शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मन्मथ माऊली, गुरुराज माऊलींचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:04 IST

तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र कपिलधार येथे मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा : राज्यभरातून भाविकांची मांदियाळी

बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता राज्यभरातून भाविक श्रीक्षेत्र कपिलधार येथे दाखल झाले होते. नेत्रदीपक असा जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ३ फेब्रुवारीपासून शिवनाम सप्ताहास प्रारंभ झाला. दररोज परमरहस्य पारायण, कीर्तन, शिवपाठ व अन्नदान करण्यात आले. शनिवारी माजलगावकर महाराजांची धर्मसभा झाली.रविवारी सकाळपासूनच जन्मोत्सवाची लगबग सुरू होती. भाविकांनी मंदिर परिसरातील पंचकुंडात स्नान केल्यानंतर कुंडातील पाण्याने मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीस अभिषेक घातला. दुपारी बारा वाजता पाळणा हलवून शिवनाम व मन्मथ माऊलींचा गजर करण्यात आला. मन्मथ माऊली, गुरुराज माऊलीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.माजलगावकर महाराज, देशीकेंद्र चंद्रशेखर स्वामी महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, शिवाचार्य गंगाधर महाराज वसमतकर, सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिंगणापूरकर यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मंदिर परिसर तसेच लगतच्या परिसरात भाविकांनी शिस्तीमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला.चांदीच्या पाळण्यात चांदीची मूर्तीजन्मोत्सवाला मन्मथस्वामींची चांदीची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवली होती तसेच मंदिरातील संजिवन समाधीवर चांदीचा मुखवटा चढवून गाभारा फुले व फुग्यांनी सुशोभित केला होता.३८ वर्षांपासून जन्मोत्सवजन्मोत्सवानिमित्त मागील आठ दिवसांपासून बीड, माजलगाव, नांदेड, लातूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून भाविक येथे दाखल होत होते. प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ वर्षांपासून मन्मथस्वामी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पंधरा दिवसांपासून जन्मोत्सवाची तयारी सुरू होती.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम