शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण ओव्हर फ्लो, 6 दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 16:12 IST

मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण शुक्रवारी पहाटे 6 वाजता 99.47 टक्के पर्यंत भरले. धरणात येणारी आवक व क्षेत्रात यानंतरही पावसाचा अंदाज असल्याने धरणाचे ६ दरवाजे तात्काळ 00.25 मी (25 मिमी ) ने उघडण्यात आले.

केज  ( बीड ),  दि 22 : मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण शुक्रवारी पहाटे 6 वाजता 99.47 टक्के पर्यंत भरले. धरणात येणारी आवक व क्षेत्रात यानंतरही पावसाचा अंदाज असल्याने धरणाचे ६ दरवाजे तात्काळ 00.25 मी (25 मिमी ) ने उघडण्यात आले. या विसर्गाने धरणाखालील नदी पात्रात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लातुर ,उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यातील 40 गावे अवलंबून असलेल्या मांजरा धरणाची पाणी पातळीची क्षमता 642.37 मीटर एवढी आहे. शुक्रवारी पहाटे  6 वाजता धरणाची पाणी पातळी 642.35 मीटर झाली. यानुसार धरण जवळपास 99.47 टक्के भरले. या सोबतच धरणात येणारी आवक व येणा-या काळातील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने  धरणाचे सहा दरवाजे 00.25 मीटरने ( 25 मिमी ) ने उघडण्याचा निर्णय घेतला. 

सध्या या धरणातील एकुण पाणी साठा 223.157 दलघमी एवढा असून धरणात येणा-या पाण्याचा आेघ 11.973 दलघमी /प्रतिसेकंद असा आहे .तर सहा दरवाजे उघडल्यामुळे धरणातुन 148.20 घनमिटर/प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग मांजराच्या नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरणा खालील नदीच्या काठावरील गावांत पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही  26 सप्टेंबर रोजी या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. 1985 पासुन 14 वेळेस या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत

82 गावांना सावधानतेचा इशाराकर्नाटक राज्याच्या सिमेपर्यंतच्या नदीकाठच्या  सौंदना ,आवाड शिरपूरा ,नायगाव ,इस्थळ , वाकडी ,आपेगाव ,पाटोदा (ममदापुर ) धानोरा ,तांदुळजा सह एकूण  82 गावातील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची  माहिती शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली

पोलिस बंदोबस्त वाढविलामांजरा धरण हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर आहे. यामुळे बीड व उस्मानाबाद पोलिस मुख्यालयाकडून कडेकोट बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली.