शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप तपासणी मोहीम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

-------------------------------- जलस्त्रोताची तपासणी करावी अंबाजोगाई : पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने दूषित पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील ...

--------------------------------

जलस्त्रोताची तपासणी करावी

अंबाजोगाई : पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने दूषित पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जलस्त्रोताची तपासणी करावी, अशी मागणी संजय देवळे यांनी केली आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरी, पोटदुखी असे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विहीर, बोरवेल, हातपंप, नळ आदी जलस्त्रोताची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

------------------------

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

अंबाजोगाई : शहरातील काही नाल्याचा उपसा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आला. मात्र तेथील कचरा काढून नाल्याच्या शेजारीच टाकण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने तो कचरा पुन्हा नालीत जात आहे. त्यामुळे या कचऱ्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कुत्तर विहीर,भट्टगल्ली, जिरे गल्ली परिसरात नाल्याशेजारी कचरा दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

----------------------

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

अंबाजोगाई : नुकतीच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे युवकांमध्ये निर्माण झाला आहे. या भरतीसाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे, या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबवण्याची मागणी आहे. पोलीस भरती प्रशिक्षणात परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने भरतीसाठी युवकांना मदत मिळते. त्यामुळे प्रशिक्षण राबवावे, अशी मागणी अक्षय जाधव यांनी केली आहे.

-------------------------

शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी

अंबाजोगाई : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते ; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेमध्ये चकरा माराव्या लागतात. तासनतास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी मानवलोक जनसहयोगच्या वतीने करण्यात येत आहे.