शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:19 IST

माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु पुढील दोन-तीन वर्ष कार्यान्वित राहिल्यानंतर मागील सात ते आठ वर्षांपासून हा जलविद्युत केंद्र केवळ यंत्र समुग्रीची योग्य देखभाल न केल्यामुळे बंद आहे.धरणातून उजव्या कालव्याद्वारे किमान ५ ते ६ पाणीपाळ्या शेतकºयांना सिंचनासाठी दरवर्षी दिल्या जातात. तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला देखील आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. वाहून जाणाºया या पाण्याचा वापर व्हावा,या हेतूने येथे जलविद्युत केंद्राची उभारणी झाली. या ठिकाणी ७५० के.व्ही. क्षमतेचे तीन संच आहेत. पैकी संच क्र. १ हा पहिल्याच वर्षी निकामी झाला तर संच क्र.२ चे द्रवचलित उच्चलक हे निकामी झाले. त्यामुळे संच ३ मध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचे साहित्य वापरल्यामुळे संच २ देखील बंद पडला. २०११ मध्ये येथील चालू असलेल्या एकमेव संचावरच वीज निर्मिती केवळ नावापुरतीच झाली. त्या नंतर मात्र २०११ पासून संपूर्ण जलविद्युत केंद्रच बंद पडलेले आहे.येथील यंत्र सामुग्रीची अवस्था भंगारात घालण्याजोगी झाली असून, आता कितीही खर्च केला तरी जलविद्युत केंद्र कार्यान्वित होईल अथवा नाही या बाबत शंकाच आहे.येथील सुरक्षा वाºयावर असून, रात्री तर सोडाच; दिवसादेखील या ठिकाणी वॉचमन अथवा कर्मचारी नसतो तरीही येथील सुरक्षेच्या नावावर खर्च केला जात असल्याची माहिती समोर आहे. अधिकाºयांनी भ्रष्टाचार चालविल्याच्या तक्रारी आहेत.तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटावा म्हणून जलसंपदा खात्याने २५ वर्षापूर्वी या वीजनिर्मिती प्रकल्पावर करोडो खर्च करत धरणावर प्रकल्प उभा केला. तेवढा खर्च देखील निघाला नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे ७-८ वर्षात एक युनिटही वीज तयार झाली नाही.गोदावरी जलविद्युत, उपसा सिंचन विभागाचे येथील शाखा अभियंता नितीन जोगळेकर यांच्याशी संपर्क केला असता, ‘मला काहीही माहिती सांगता येणार नाही, तुम्ही औरंगाबादला या’ म्हणत टाळाटाळ केली. तर कार्यकारी अभियंता डी.एस. तडवी यांनी देखील असेच उत्तर देऊन येथे चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत कानावर हात ठेवला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBeedबीड