शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

माजलगाव दणाणले ; शेतक-यांच्या प्रश्नासाठी सेनेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:47 IST

माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्दे..अन्यथा कारखाने बंद पाडू : शिवसेना

माजलगाव : माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवसेना बंद पाडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बुधवारी दिला. माजलगावात काढलेल्या बैलगाडी मोर्चात ते बोलत होते.

माजलगाव शिवसेनेच्या वतीने शेतक-यांना बोंडअळीमुळे नुकसान भरपाई द्यावी, विज बील माफ करून २४ तास वीज पुरवठा करावा, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, उसाला तीन हजार रूपये भाव द्यावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली आॅनलाईन प्रक्रिया रद्द करावी, यासारख्या विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयावर जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, आप्पासाहेब जाधव, शहर प्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुका अधिकारी अ‍ॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले होते. घोषणांनी माजलगाव शहर दणाणून गेलेहोते.पहिल्यांदाच ऐतिहासिक बैलगाडी मोर्चामाजलगाव तालुक्यात शेतक-यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये जवळपास २०० बैलगाडी सहभागी होत्या. त्यांची रांग ही दोन कि.मी. पर्यंत होती. परंतु शिस्त असल्यामुळे हा मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.

शेतकरी, व्यापाºयांसाठी हेल्पलाईन - जाधवतालुक्यातील शेतकरी, व्यापारी, महिला-मुली यांच्यावर कुणी अन्याय करत असेल तर मदतीचा हात म्हणून शिवसेनेकडून हेल्पलाईन (मो.९३९३१८९५९५) सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी पाच मिनीटात शिवसैनिक किंवा मी स्वत: धावून येईल, असे आप्पासाहेब जाधव यांनी सांगीतले.

पालकमंत्री आमदारांना देणे-घेणे नाहीसचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतक-यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतक-यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे राहिलेले नाही. विधानभवनात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शब्दही उच्चारला नाही, असे सांगितले. त्यातच तालुक्यातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहेत. मागील तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत जोपासलेल्या ऊसाला कारखानदारांकडून कवडीमोल भाव देण्यात येत असून त्यात शेतक-यांच्या हिताची असलेल्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद न घेण्याचे धोरण स्विकारले आहे. परंतु आपण हे धोरण कदापी सहन करणार नसून कारखान्यांनी नोंद न घेतल्यास तीनही कारखान्यांचे धुरांडे बंद पाडल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मुळूक यांनी दिला.