अनिल देशमुख हे १७ ऑगस्ट रोजी पाटील गल्ली येथील आपल्या राहत्या घराला कुलूप लावून औरंगाबाद येथे मुलाकडे गेले होते. २ सप्टेंबर रोजी रात्री ते माजलगाव येथे परतले. कुलूप उघडून त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील सामान विखुरलेले होते. अज्ञात चोरट्यांनी घरात कुलूप तोडून चोरी केल्याचे लक्षात आले. घरातील लॅपटॉप, तीन मोबाइल, ३ ग्रॅम सोन्याचे कानातले झुंबर , सोन्याची, चांदीच्या समई, चांदीची वाटी,चांदीचे चैन, करंडा, विदेशी घड्याळ व कपाटातील नगदी १५ हजार रुपये असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यावेळी चोरट्यांनी देशमुख यांच्या घरातील चोरी उघडकीस येऊ नये म्हणून घरातील दुसरे शिल्लक कुलूप जाता वेळेस बाहेरच्या दरवाजाला लावले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगावात पाटील गल्लीत सव्वा लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST