शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या उपसभापतीपदी महादेव तोंडे - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे महादेव तोंडे बहुमताने विजयी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे महादेव तोंडे बहुमताने विजयी झाले. भाजपाच्या विजयासाठी रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे हे येथे ठाण मांडून बसले होते. बाजार समिती भाजपाचे ताब्यात ठेवण्यात त्यांना यश आले. धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजपाच्या ताब्यात असून येथील सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत ही संस्था ताब्यात ठेवण्यासाठी संचालकात फूट पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार होती. त्यानुसार भाजप नेते रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे यांनी सभापती निवडीणुकीत भाजपाचे दहा सदस्य एकत्र ठेवण्यात यश मिळविले. सभापतीपदी सुनील शिनगारे यांची निवड झाली. त्यानंतर उपसभापती पद ताब्यात ठेवणे भाजपसाठी आवश्यक हाेते. शुक्रवारी झालेल्या निवडीच्या वेळी भाजपाकडून महादेव तोंडे यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेणुका श्रीराम बडे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामध्ये भाजपाचे महादेव तोंडे यांना दहा मते मिळाली. या निवडीनंतर साजरा केला. भाजपाला ही संस्था ताब्यात ठेवण्यात यश आले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

160821\16bed_3_16082021_14.jpg

महादेव तोंडे उपसभापती