शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी; शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:50 IST

रविवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर, ढेकणमोहा, वांगी, शिवणी परिसरात सोम्य गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे पोहचला आहे. परंतू यात बीड तालुक्याचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. या संदर्भात संपर्क साधला असता बीड तालुक्यातील पाली व पिंळनेर मंडळात अल्प प्रमाणात गारपीट झाली. परंतू पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिल्याचे बीड तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपाली, पिंपळनेर मंडळात गारपीट मात्र नुकसान नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रविवारी बीड तालुक्यातील पिंपळनेर, ढेकणमोहा, वांगी, शिवणी परिसरात सोम्य गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे पोहचला आहे. परंतू यात बीड तालुक्याचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. या संदर्भात संपर्क साधला असता बीड तालुक्यातील पाली व पिंळनेर मंडळात अल्प प्रमाणात गारपीट झाली. परंतू पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिल्याचे बीड तहसील कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

दरम्यान वांगी येथील प्रगतशील शेतकरी जीवनराव बजगुडे यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले, मोठे नुकसान झाले नसलेतरी गहू ओंब्यात आहे. आंब्याला बारीक फळे लागली आहेत. गारपीटीचा परिणाम पिकांवर होणारच आहे. या परिसरात आंब्याचा मोहोर आधीच करपला होता. नंतर बहरलेला मोहोर आता कळून पडत असल्याचे बजगुडे म्हणाले.पंचनामे सुरुबीड जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २६ हजार ५८० एकरातील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या निर्णयानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले.

गारपीट नुकसानीचे पंचनामे करावेतबीड : शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी जिल्हाधिकारी श्री. एम.डी. सिंह यांची भेट घेवुन गारपीट झालेल्या भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली आहे. बीड, गेवराई, माजलगाव, शिरूर का. या तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामधील उभे पिक गहु, हरभरा, ज्वारी तर पपई, मोसंबी, आंबा या सारख्या फळपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्या काही तासातच गारांच्या फटकयामुळे रब्बी पिके आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ.मेटे यांनी केली आहे.

अंबाजोगाईत उभी पिके झाली आडवीअंबाजोगाई : सर्वत्र सुरू असलेल्या गारपिटीचा तडाखा मध्यरात्रीनंतर झालेल्या गारांच्या पावसाने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना बसला. तर सुसाट वाºयामुळे ज्वारी, गहू व हरभºयाची पिके आडवी झाली आहेत. काढून ठेवलेले हरभºयाचे ढिगारे पावसामुळे मोठ्या प्रमाणात भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यात रविवारी रात्री राडी, मुडेगाव, धानोरा, अकोला, तडोळा, राडी-तांडा, अंजनपूर, कोपरा या परिसरात गारांचा पाऊस झाला. या गारपिटीमुळे व सुसाट वाºयामुळे शेतात उभी असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, करडई, ही पिके मोठ्या प्रमाणात आडवी पडली. तर अनेक शेतक-यांनी हरभ-याची काढणी करून ठेवली होती. अनेकांचे ढिगारे सुसाट वा-यामुळे उडून गेले तर पावसात ढिगारे भिजल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे.

खासदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणीगेवराई : निसर्गाच्या कोपाने पुन्हा एकदा शेतकºयांना अडचणीत आणले आहे. तरी आलेल्या सकंटाला तोड देणा-या शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकºयांनी पीक विमा भरणा केला नसेल त्यांनी घाबरु नये. कारण पीक विमा भरला नसलेल्या शेतक-यांना सुध्दा नुकसान भरपाई मिळेल, असे खा. प्रीतम मुंडे यांनी खळेगाव येथे पडझड झालेल्या घराची व पिकाची पाहणी करताना सांगीतले. अचानक झालेल्या गारपिठीने तालुक्यातील पडझडीच्या घराची व पिकांची नासाडी झालेली असून शेतकºयांवर संकट आले आहे. त्यामुळे गारपीट झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी बीडच्या खा. प्रीतम मुंडे यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता तालुक्यातील खळेगाव येथील शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आ. लक्ष्मण पवार, विजय गोल्हार, प्रकाश सुरवसे, संतोष हंगे, नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, राजेंद्र आर्दड, कृष्णा काकडे, राम पवार, आप्पासाहेब कानगुडे, प्रल्हाद येळापुरे, संजय आंधळे, नायब तहसीलदार, कृषी सहाय्यक, तलाठी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.