शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कमळ की घड्याळ; विनायक मेटेंच्या भूमिकेकडे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:30 IST

शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज भूमिका जाहीर करणार

बीड : ‘राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही’ अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटेंना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘असे चालणार नाही, एकच ठरवा’ असा अल्टीमेटम दिल्यानंतर बीड येथे गुरुवारी दुपारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यात मेटे काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद टोकाला गेला. सतत पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते. यानंतरही आ. मेटे हे लोकसभेच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याबाहेर भाजपसोबत दिसले; परंतु बीडमध्ये मात्र त्यांची भूमिका बदलली नव्हती.

इकडे पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभेची निवडणूक असतानाही पंकजा मुंडे या दोन पावले पुढे येण्यास तयार नाहीत. आगामी विधानसभेच्या दृष्टीकोनातून बघितले असता भविष्यातही मुंडेंकडून मेटेंना सहकार्य मिळेलच याची शक्यता नाही.

‘लाल दिव्या’ला अडथळा!इकडे मेटेंची राष्ट्रवादी काँग्रेससोबतची ‘घडी’ बिघडलेली आहे. राष्ट्रवादीचे बीडचे स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर युतीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीसाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जाऊनही फारसे काही हाती लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मेटे यांना उद्याच्या मेळाव्यामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेली घनिष्ट मैत्रीच कदाचित त्यांचा भाजपसोबतचा निर्णय बदलू शकते. युती सरकारचा कार्यकाळ सहा महिने बाकी आहे. युतीसोबत जर ते राहिले नाही तर भविष्यात त्यांच्या ‘लाल’ दिव्याच्या मार्गात आणखी अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा या परिस्थितीत उद्याच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vinayak Meteविनायक मेटे