शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परळीत रविवारपासून राखेची उघडी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:17 IST

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती.

ठळक मुद्देदाऊतपूर - टोकवाडी बंधा-यातून राख उचलण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर व टोकवाडीच्या राख बंधाºयातील राखेची रस्त्यावरुन होणारी वाहतूक रविवारपासून बंद झाली आहे. राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखावे या मागणीसाठी शनिवारी कन्हेरवाडीत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने औष्णिक विद्युत मुख्य अभियंत्यांना वाहतूक व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही राख तळ्यातून राख उचलणे बंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणाºया राखेच्या थराचे प्रदूषण थांबले आहे.

परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव, संगम परिसरातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणाºया दगडी कोळशाच्या वापर केला जातो. कोळसा जळाल्यानंतर ही राख पाईपद्वारे राख तळ्यात सोडली जाते. त्या राखेचा उपयोग वीटभट्टीसाठी केला जातो. त्या राखेची वाहतूक १०० ट्रॅक्टर, २०० टिप्पर व ५० ट्रकद्वारे तळ्यातून वाहतूक केली जाते.

राखेची ही वाहतूक व्यवस्थित केली जात नसल्याने रस्त्यावरच राख सांडली जाते. ही राख हवेने उडून इतर वाहनांना अडचणीचे ठरत असून, अपघाताची भीती वाढली आहे. धर्मापुरी फाटा ते दादाहारी वडगाव या रस्त्यावर तर दिवसाही राख सांडलेली असते. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दादाहारी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे म्हणाले.

शनिवारी कन्हेरवाडीच्या रस्त्यावर राख सांडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडगे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली.

उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना राखेच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारपासून तळ्यातील राख जेसीबीने उचलणे थांबविले आहे.

बीडसह तीन जिल्ह्यात राखेची वाहतूकही राख लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नेकनूर, केज, अंबाजोगाई, बीड, माजलगाव, पैठण आदी भागांसह अन्य शहरातील वीट उत्पादकांना पुरविली जाते. राखेच्या वाहनांवर आच्छादन न टाकता उघड्या वाहनातून शहरातील विविध मार्गांवरून वाहतूक केली जात असल्याने परळीकरही हैराण आहेत.