रिॲलिटी चेक
बीड : काही दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटर व जिल्हा रुग्णालयात सर्रास नातेवाईक फिरत असल्याचे समोर आले होते, परंतु रविवारी शहरातील आयटीआयच्या कोविड केअर सेंटरची पाहणी केली असता, येथे नातेवाइकांना सेंटरमध्ये येण्यास बंदी होती. मुख्य गेटला कुलूप लावून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि शिपाई नियुक्त केले आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहेत. जे लोक कोरोनाबाधित आले आहेत, परंतु किरकोळ लक्षणे आहेत, अशांना या सेंटरमध्ये ठेवले जाते, परंतु मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढल्याने, शहरातही तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. यातीलच शासकीय आयटीआयमधील कोविड केअर सेंटरला रविवारी अचानक भेट दिली. यावर येथील व्यवस्था व नियोजन पाहिले असता, नातेवाइकांना आत-बाहेर करण्यास बंदी घालण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी आणि शिपाई बसवून गेटला कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था नीटनेटकी असल्याचे दिसली. येथील प्रमुख डॉ.अमित बायस यांनी आपण नियमित आढावा घेत असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी सीसीसी वादात
काही महिन्यांपूर्वी या कोविड केअर सेंटरबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. येथील कर्मचारी मुजोरपणाने वागत होते, तसेच वेळेवर जेवण न मिळणे, अस्वच्छता अशा तक्रारी वाढल्या होत्या. याची डॉ.बायस यांनी गंभीर दखल घेत सर्व नियोजन केले. आता परिस्थिती बदलली असून, सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे दिसले, तसेच सुविधांबद्दलही तक्रारी कमी झाल्या आहेत.
कोट
काही दिवसांपूर्वी थोडे नियोजन बिघडले होते. आता आम्ही पूर्ण सुधारणा केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण काळजी घेतली जात आहे. रुग्ण व नातेवाइकांना आत-बाहेर करण्यास पूर्णपणे बंदी आहे. पोलीस व शिपाई मुख्य गेटवर नियुक्त केले आहेत.
डॉ.अमित बायस, प्रमुख सीसीसी आयटीआय बीड
===Photopath===
210321\3756212_bed_15_21032021_14.jpeg
===Caption===
आयटीआयमधील सीसीसीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून शिपाई बसविण्यात आल्याचे दिसले.