बीड : राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा आजच्या युवक-युवतींनी जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी केले.
माऊली विद्यापीठ संचलित येथील महिला कला महाविद्यालयात दिन विशेष समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना प्राचार्य डॉ. सविता शेटे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन आणि त्यांचे काम यातच त्यांची सामाजिक न्यायाची भूमिका दिसून येते. समाजातील जातीयता, वर्णव्यवस्था, कर्मकांड, रुढी आणि परंपरा याला छेद देऊन सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी प्रस्थापित केली. मूठभर लोकांच्या हाती असलेली शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी खुली करून देणारा पहिला राजा म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. दुर्बल घटकांना एका सामाजिक स्तरावर आणण्यासाठी त्यांनी आरक्षण देऊन दुर्बल घटकांना शिक्षण दिले. महात्मा फुले यांचा वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने रुजविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्यांनी शिष्यवृत्तीसाठी फार मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे एकूणच कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आजच्या युवक-युवतींनी वारसा जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन दिन विशेष समितीच्या प्रभारी डॉ. अर्चना वाघमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
भित्तीपत्रकाचे प्रकाशन
प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भित्तीपत्रक समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व कर्तृत्व या विषयावर डॉ. अंकुश काळे यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी केले.
===Photopath===
270621\27_2_bed_8_27062021_14.jpg
===Caption===
महिला कला महाविद्यालय भित्तीपत्रक प्रकाशन