धारूर : धारूर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचे आरक्षण पुन्हा काढत असताना बरीच धाकधूक होती. मात्र थोडेफार बदल होता तेच आरक्षण कायम राहिले आहेत. नुकत्याच निवडणुका झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी फक्त दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षणामध्ये बदल झाल्याने या आरक्षणाबद्दल आनंद व्यक्त केला जात होता.
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचे आरक्षण पुन्हा काढण्यात आले. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर हे आरक्षण काढण्यात येत असल्याने थोडी धाकधूक होती. यावेळी तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पंचायत समितीचे सभापती हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे हे प्रमुख उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती व जमातीच्या पूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले. नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गटातील आरक्षण काढण्यात आले.
यावेळी तालुक्यातील आरक्षण चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव गांजपूर, अनुसूचित जमाती - भोगलवाडी, अनुसूचित जाती महिला - चारदरी, चिंचपूर, व्हरकटवाडी, सुरनरवाडी, गोपाळपूर, अनुसूचित जाती- गांवदरा, घागरवाडा, वाघोली, मैंदवाडी. नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला - चाटगाव, सोनीमोहा, कासारी, मोहखेड, पांगरी, जहागीरमोहा, पिंपरवाडा, कान्नापूर. नागरिकाचा मागास प्रवर्ग - आंबेवडगाव, चोरांबा, कुंडी, रुईधारूर, भोपा, कोळपिंप्री, उमरेवाडी. सर्वसाधारण महिला - पहाडी दहीफळ, पहाडी पारगाव, कोथिंबीरवाडी, देवदहीफळ, अंजनडोह, मुंगी, कोयाळ, हिंगणी (खु), सिंगनवाडी, चिखली, धुनकवाड, आसरडोह, कारी, तेलगाव. खुला प्रवर्ग - संगम, आमला, आरणवाडी, आसोला, आवरगाव, चोंडी, देवठाणा, फकीरजवळा, हिंगणी(ब्रु), खोडस, मोरफळी, सुकळी, तांदळवाडी, बोडखा. अशा प्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघाली. किरकोळ बदल झाले. नुकत्याच झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणात जहागीरमोहा भोप व कोथिंबीरवाडी येथील आरक्षण पूर्वीचेच कायम राहिले; तर रुईधारूर येथील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असणाऱ्या नागरिकांचा मागास प्रवर्ग असे, तर कासारी येथील नागरिकांचा मागास प्रवर्ग असणाऱ्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे झाले.