आष्टी तालुक्यात १२५ ग्रामपंचायती असून २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात संपन्न झाली. यामधील पहिल्या टप्प्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या आहेत. त्यांचे आरक्षण पूर्वीप्रमाणे राहिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ४ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृृृहात तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण पुढीलप्रमाणे अनु. जाती सरपंच ७ महिला, ६ पुरुष एकूण १३, तर अनु. जमाती २ महिला, १ पुरुष, असे एकूण ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ महिला, १७ पुरुष एकूण ३४, सर्वसाधारणसाठी ३८ महिला व ३७ पुरुष असे एकूण ७५ या पद्धतीने तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण सुटले आहे. कडा, पारोडी, कुंटेफळ, पुंडी या तीन ग्रामपंचायतींची सोडत चिठ्ठीद्वारे झाली आहे. यावेळी तहसीलदार रामभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे उपस्थित होते.