शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्स ऑफलाईनच बरे; आरटीओच्या कार्यालयात पुन्हा वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स, वाहनांची नोंदणी, वाहने नावावर ...

अविनाश मुडेगावकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स, वाहनांची नोंदणी, वाहने नावावर करणे, वाहनांचे पासिंग करणे आदी विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे; मात्र याबाबत पुरेशी न झालेली जागृती तसेच अनेक ठिकाणी इन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी, यामुळे नागरिकांचा अजूनही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन लायसन्स काढण्यावर भर दिसून येत आहे.

अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत माजलगाव, परळी, धारूर, केज आदी शहरे येतात. त्यामुळे दररोज येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहनाशी संबंधित कामांसाठी आरटीओ कार्यालयात येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. कोरोनाचा काळ लक्षात घेता नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायसन्स ऑनलाईन मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

नागरिकांना या सुविधेबाबत विचारले असता त्यांनी माहिती नसल्याने आपण कार्यालयात आल्याचे सांगितले. ऑनलाइनद्वारे लर्निंग लायसन्स कसे काढायचे? त्यात चूक झाली तर काय? लायसन्स मिळाले नाही तर काय? करायचे असे प्रतिप्रश्न त्यांनी विचारले. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे, शिबिरे घेऊन मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

....

ऑनलाइनसाठी अडचणी काय?

ऑनलाइनद्वारे लायसन्स काढताना अनेकदा इंटरनेट हँग होते. आरटीओची वेबसाईट कोणती? ती मिळाल्यास कोणत्या पेजवर जाऊन अर्ज करायचा. याबाबत नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आहे.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन पेपर कसा द्यायचा, याची माहितीही अनेकांना नाही.

ऑनलाइन प्रक्रिया किचकट वाटत असल्याने अनेक जण थेट आरटीओ कार्यालयात जाणेच पसंत करतात.

...

...म्हणून आरटीओ कार्यालय गाठले

आरटीओच्या वेबसाईटची माहिती नाही. मार्गदर्शन करायला कोणी नाही. त्यापेक्षा वेळ गेला तरी थेट आरटीओ कार्यालयात जाऊन लायसन्स काढणे सोपे वाटते. कोविड असल्याने जरी नियम कडक असले, तरी काही तासांत काम होते.

-एक लाभार्थी.

....

ऑनलाइनद्वारे थेट लायसन्सची सुविधा सरकारने दिली असली तरी अद्याप त्याची सुरुवात झाली आहे का हा प्रश्न आहे. वेबसाईटची लिंक मिळवून, त्यात अर्ज करणे, परीक्षा देणे किचकट वाटते. त्यापेक्षा कार्यालयात येऊन लर्निंग लायसन्स काढणे सोपे वाटले. अधिकारीही येथे चांगले मार्गदर्शन करीत आहेत.

-एक लाभार्थी.

....

उमेदवार वेगळा, परीक्षा देणारा दुसराच

ज्याला लायसन्स काढायचे त्याच्या नावावर दुसराच कोणीतरी परीक्षा देत असल्याचा प्रकार घडू नये, यासाठी या ठिकाणी काळजी आरटीओ कार्यालयात घेण्यात येत आहे. ऑनलाइन परीक्षेवेळी हा घोळ होऊ शकतो. त्यामुळे पारदर्शकता किती राहील हा मोठा प्रश्न असल्याचे जाणकारांचे मत आहे.

....

ऑनलाइन लर्निंग लायसन्सची सुविधा सुरु असली तरी नागरिकांना आरटीओ कार्यालयात येऊन लर्निंग लायसन्स काढणे सोपे जात आहे. अनेकांनी त्याचा प्रयत्नही केलेला नाही. आठवडाभरापासून अनेकजण कामानिमित्त कार्यालयात येत आहेत. त्यामुळे कोविडचे सगळे नियम पाळून सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान कामकाज सुरू आहे. दिवसाला २२ ते २५ नागरिकांना लर्निंग लायसन्स दिले जात आहे. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या दिवसाला ७० पर्यंत होती.

-दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.

....

किती लायसन्स दिले?

लर्निंग लायसन्स

२०१९-२०२०-३७९०४

२०२०-२०२१-३२७९३

...

पर्मनंट लायसन्स

२०१९-२०२०-११६००

२०२०-२०२१-१०१४१

...

आतापर्यंत ई-पद्धतीने दिलेले लर्निंग लायसन्स-१७४