शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कोरोना पीडित कुटुंबांना किराणा किट वाटपाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

शिरूर कासार : कोरोना संक्रमण काळात सतत अग्रेसर राहिलेल्या शांतीवन प्रकल्पाने पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

शिरूर कासार : कोरोना संक्रमण काळात सतत अग्रेसर राहिलेल्या शांतीवन प्रकल्पाने पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यातील कोरोनाची बाधा झालेल्या गरीब कुटुंबांना एक महिना पुरेल इतके किराणा सामान किट वाटपाचा शुभारंभ शुक्रवारी सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात झाला. शांतीवन, आनंदवन यांच्या कामात गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानची कायम भागीदारी राहील, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. व्यासपीठावर शिरूरआष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे, सर्जेराव तांदळे, अजय धोंडे, जयदत्त धस, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सभापती उषा सरवदे, चंपाबाई पानसंबळ, ॲड. भाग्यश्री ढाकणे ,नगरसेविका वर्षा सानप आदी उपस्थित होते.

आनंदवन, शांतीवन आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे कोविड सेंटर सुरू करून मोफत सेवा देण्याचे काम केले. कोरोनामुळे काम करणे अवघड होत असल्याने गरीब कुटुंबाला किमान एक महिना पुरेलएवढा किराणा सामान वाटप करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात पन्नास कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यात गावात जाऊन गरजूंना उर्वरित किट पोहच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रास्ताविक शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी केले. आमदार बाळासाहेब आजबे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य रामराव खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, रामदास बडे, डॉ. रमणलाल बडजाते, इंदुबाई गोल्हार, पिंपळनेरचे सरपंच बबनराव जायभाये, दहिवंडीच्या सरपंच शीला आघाव, आनंदगावचे प्रल्हाद विघ्ने, मानूरचे विठ्ठल वणवे, घोगसपारगावचे देवा गर्कळ, बावीचे नवनाथ ढाकणे, एम. एन. बडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, फय्याजभाई शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन कुंभारकर यांनी केले. सेवाश्रमचे सुरेश राजहंस यांनी आभार मानले.

030721\img-20210702-wa0053.jpg

दोन हजार कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ मा.पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत