शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

दोन हजार कोरोना पीडित कुटुंबांना किराणा किट वाटपाचा शुभारंभ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

शिरूर कासार : कोरोना संक्रमण काळात सतत अग्रेसर राहिलेल्या शांतीवन प्रकल्पाने पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

शिरूर कासार : कोरोना संक्रमण काळात सतत अग्रेसर राहिलेल्या शांतीवन प्रकल्पाने पुन्हा एकदा मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यातील कोरोनाची बाधा झालेल्या गरीब कुटुंबांना एक महिना पुरेल इतके किराणा सामान किट वाटपाचा शुभारंभ शुक्रवारी सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात झाला. शांतीवन, आनंदवन यांच्या कामात गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानची कायम भागीदारी राहील, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. व्यासपीठावर शिरूरआष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे, सर्जेराव तांदळे, अजय धोंडे, जयदत्त धस, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सभापती उषा सरवदे, चंपाबाई पानसंबळ, ॲड. भाग्यश्री ढाकणे ,नगरसेविका वर्षा सानप आदी उपस्थित होते. आनंदवन, शांतीवन आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे कोविड सेंटर सुरू करून मोफत सेवा देण्याचे काम केले. कोरोनामुळे काम करणे अवघड होत असल्याने गरीब कुटुंबाला किमान एक महिना पुरेलएवढा किराणा सामान वाटप करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात पन्नास कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यात गावात जाऊन गरजूंना उर्वरित किट पोहच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी केले. आमदार बाळासाहेब आजबे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य रामराव खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, रामदास बडे, डॉ. रमणलाल बडजाते, इंदुबाई गोल्हार, पिंपळनेरचे सरपंच बबनराव जायभाये, दहिवंडीच्या सरपंच शीला आघाव, आनंदगावचे प्रल्हाद विघ्ने, मानूरचे विठ्ठल वणवे, घोगसपारगावचे देवा गर्कळ, बावीचे नवनाथ ढाकणे, एम. एन. बडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, फय्याजभाई शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन कुंभारकर यांनी केले. सेवाश्रमचे सुरेश राजहंस यांनी आभार मानले.

030721\0512img-20210702-wa0053.jpg

दोन हजार कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ मा.पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत