शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरांसाठीच धावते लालपरी, १०० गावांना जीप, टमटमचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातून सध्या केवळ शहरी भागांतील गाड्या सुरू असून, ग्रामीण भागातील १०० गावच्या बस बंदच ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : येथील आगारातून सध्या केवळ शहरी भागांतील गाड्या सुरू असून, ग्रामीण भागातील १०० गावच्या बस बंदच असल्याने या गावातील नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यामुळे या वाहनधारकांकडून मनमानी भाडे लावले जात असून, नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे, तर सध्या या आगारास दररोजचे चार लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे.

पहिल्या लॉकडाऊननंतर जेव्हा बससेवा सुरू झाली, तेव्हा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण दिसत होते. त्यामुळे अनेक दिवस बस प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती; परंतु दुसऱ्या लॉकडाऊननंतर प्रवाशांची मानसिकता बदलेली दिसून येत होती. सध्या ग्रामीण भागातील बस बंद असल्याने या आगारातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी बस सुरू केल्या आहेत. या गाड्यांना सध्या चांगला फायदा होताना दिसत आहे.

माजलगाव आगाराकडे एकूण ५८ बस असून, सध्या यातील ४२ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. यामुळे येथील ९५ चालक व १२० वाहक कामावर कार्यरत आहेत. या आगारातून सध्या ग्रामीण भागातील १०० फेऱ्या बंद झाल्या असल्या तरी या गावातून जिल्ह्याबाहेरील अनेक शहरांना बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे सध्या आगारातून १५० फेऱ्या सध्या सुरू आहेत. या माध्यमातून सध्या आगाराला दररोज ४ लाख रुपये उत्पन्न मिळत असून, पूर्वी हेच उत्पन्न ६ लाखांपर्यंत होत होते. या आगाराची शहरापेक्षा ग्रामीण भागावर मदार असल्यामुळे आगाराला चांगलेच नुकसान सहन करावे लागत आहे.

----

माजलगाव आगार एकूण बस - ५८

सध्या सुरू असलेल्या बस - ४२

आगारातच उभ्या बस - १६

२) एकूण कर्मचारी - २७८

चालक - ९५

वाहक - १२०

इतर- ६३

सध्या कामावर चालक - ९५

सध्या कामावर वाहक - १२०

मोठेवाडी, आबेगावला बस कधी सुरू होणार?

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, मोठेवाडी, देवडी, मंजरथ, हिवरा, मोगरा, आनंदगाव, आबेगाव, बोरगाव यासह अनेक गावांना सध्या बस जात नसल्याने प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अद्याप सेवा सुरू केलेली नसून प्रवासी प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाची लाट ओसरली आहे, त्यामुळे बससेवेची मागणी आहे; परंतु वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर बसोवा सुरू होऊ शकते.

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

सध्या ग्रामीण भागातून इतर ठिकाणी जाण्यासाठी बससेवा सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना जीप, टमटम, छोटा हत्ती आदी खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागतो. बस वेळेवर येत असे; परंतु सध्या बस नसल्याने खाजगी वाहनधारकांची मनमानी सुरू असून, भाडेही डबल घेत आहेत.

खासगी वाहनांतून भाडे चारपट

रापमच्या बस प्रवासात आम्हाला प्रवास भाड्यात निम्मी सवलत आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना खर्चही कमी येतो; पण सध्या जीप, टमटममधून प्रवास करण्यासाठी चारपट पैसे लागत आहेत. ---रघुनाथ कदम, प्रवासी

----

बससेवा सुरू नसल्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची सध्या मनमानी सुरू आहे. वाटेल तेव्हा ते निघतात, वाटेल तेव्हा ते येत असल्यामुळे वेळेत येता जाता येत नाही, तसेच भाडेदेखील त्यांच्या हिशोबाने द्यावे लागत आहे.

---महादेव धपाटे, प्रवासी

------------