लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण दाखल होत आहेत. येथील रुग्णालयातील कोविड योद्धे आपल्या परिवारासह जीव मुठीत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टर, कर्मचारी आठ तास ड्युटी करून निवासस्थानी गेल्यानंतर स्नान, कपडे धुण्यासाठी पाणी लागते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रासह देशात कोविडचे संकट वाढत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस सतर्क राहावे लागत असून, नऊ ते दहा तास कर्तव्य बजवावे लागत आहे. वास्तविक पाहता याठिकाणी बोरला पाणी आहे; पण त्याचे व्यवस्थापन नीट होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करून कोविड योद्ध्यांची हेळसांड थांबवण्याची मागणी होत आहे.
कोविड योद्ध्यांचे पाण्याअभावी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST